पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश घेण्यात आले आहेत. तसेच उद्यानं एकवेळ बंद राहणार आहे. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा”
“अखेर MPSC परीक्षेची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार परीक्षा”
“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद”
“नवऱ्याचे हात पाय बांधले, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ दाखवला आणि…”