Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिकांची बीड ते मुंबई पायी ‘निष्ठा’ यात्रा

उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिकांची बीड ते मुंबई पायी ‘निष्ठा’ यात्रा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावत आहेत. उद्यापासून बीड शहरातील शिवसैनिकांकडून बीड ते मुंबई पायी निष्ठा यात्रा काढली जाणार आहे.

बीड शहरातील येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उद्या पासून  21 दिवसांच्या पायी निष्ठायात्रेला सुरूवात होणार आहे. या पायी निष्ठा यात्रेला शिवसेना बीड जिल्हासंपर्क प्रमुख धोंडू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप भगवा झेंडा दाखवतील.

हे ही वाचा : वेदांता-फाॅक्सकाॅननंतर आता ‘हा’ मोठा प्रकल्पही राज्याबाहेर?; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

दरम्यान, या पायी दिंडीत माजी तालुका प्रमुख उल्हास गिराम यांच्यासह माजी नगरसेवक सुनील अनभुले, शिव सहकार सेनेचे जिल्हा संघटक पंकज कुटे, तालुकाप्रमुख गोरख सिंगण, माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनील गवते, वरवटीचे सरपंच प्रदीप काटुळे, बाळु वैद्य, नंदू जोगदंड, अक्षय काशीद यांच्यासह दिडशे शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“नाशिकमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन; रस्त्यावर पिंडदान करत केली ‘ही’ मोठी मागणी”

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..

सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा; काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम