आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळा प्रकरणात एकापाठोपाठ सलग पाच ट्विट केले होते. त्यात त्यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटलं होतं. यावरून आता भाजपचे माढाचे खासदार रणजिंतसिंह निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”
आताच त्या 5 जणांची नावे सांगणे गोपनीयतेचा भंग होईल. येत्या काळात ती नावे सर्वांसमोर येतीलच, असं निंबाळकर म्हणाले. तसेच कंबोज यांचा रोख हा अजित पवारांकडे नसून तो पक्षातील दुसराच नेता आहे, असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा तो पाचवा नेता कोण असेल?, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते आपल्याला लवकरच कळेल असं उत्तर निंबाळकर यांनी यावेळी दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार, ‘या’ भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य