आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : राष्ट्रवादीने प्रदेश कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदाची धुरा शेखर सावरबांधे यांच्याकडे सोपवली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली. याबाबतचे पत्र राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज शेखर सावरबांधे यांना सुपूर्द केले. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा : “मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं”
2014 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातून त्यांना शिवसेनेकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट 2021ला शिवसेनेला राम राम ठोकला. त्यानंतर राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावरबांधे हे नागपूर महापालिकेत उपमहापौर होते. तसेच शिवसेनेचे नागपूर जिल्हाध्यक्षही होते.
दरम्यान, शेखर सावरबांधे यांनी 1992 पासून राजकीय करिअरला सुरुवात केली. तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. नंतर 2002 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, पक्षाबाहेरून शिवसेनेत आलेल्यांकडे शिवसेना पक्षाची सूत्रे आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यामुळेच आता जोमाने कामाला लागून पक्षाला सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न ते करतील.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- धनंजय मुंडे
“नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला”
रोहित-राहुलकडून स्काॅटलंडचा धुव्वा; भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित