Home क्रीडा रोहित-राहुलकडून स्काॅटलंडचा धुव्वा; भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित

रोहित-राहुलकडून स्काॅटलंडचा धुव्वा; भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भारत विरूद्ध स्काॅटलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या निर्णायक सामन्यात भारताने स्काॅटलंडचा 8 विकेट्सने पराभव करत सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या.

भारताने टाॅस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत स्काॅटलंडला केवळ 17.4 षटकात केवळ 85 धावांवर रोखलं. स्काॅटलंडकडून जाॅर्ज मुनसेनं सर्वाधिक 19 चेंडूत 24 धावा केल्या. तर भारताकडून मोहम्मद शमी व रवींद्र जडेजाने प्रत्येकी 3, जसप्रित बुमराने 2, तर रविचंद्रन अश्विनने 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : “…तर पुढेही महाविकास आघाडीचे सरकार येणार?”

दरम्यान, भारताला सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी हे लक्ष्य 7.1 षटकात पूर्ण करण्याची आवश्य़कता होती. मात्र भारताने हे लक्ष्य केवळ 6.3 षटकात 2 विकेट गमावत पूर्ण केलं. भारताकडून के.एल.राहुलने 19 चेंडूत 50 धावांची वेगवान खेळी केली. तर रोहित शर्माने 16 चेंडूत 30 धावा केल्या. तर स्काॅटलंडकडून मार्क वाॅट व व्हीलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी – 

“नारायण राणेंसारख्या भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं; त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये”

“नारायण राणेंसारख्या भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं; त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये”

नातेवाईकांकडे आयकर विभागाच्या धाडी; शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…