Home नाशिक राष्ट्रवादीचा भाजपाला धक्का; माजी नगराध्यक्षासह भाजपच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचा भाजपाला धक्का; माजी नगराध्यक्षासह भाजपच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला संपर्क कार्यालयात येवल्याचे माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, माजी नगराध्यक्ष व अपक्ष नगरसेवक शफिक शेख, भाजपचे नगरसेवक सुनील काबरा यांच्यासह विविध पक्षाचे आजी-माजी नगरसेवक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हे ही वाचा : संजय राऊत म्हणाले, सोमय्या वेडा झालाय; आता किरीट सोमय्या, म्हणतात…

पक्षच्या कामकाजासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची साथ आम्हाला मिळाली असून सर्व प्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोमाने कामाला लागावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

दरम्यान, भाजपातून राष्ट्रवादी पक्षात आलेल्या कार्यर्त्यांच्या स्वागतानंतर आता जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपातून आलेल्या कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना छगन भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; भाजपच्या ‘या’ आमदारांनी NCP ला डिवचलं

“शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ 5 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

“जळगावमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”