राष्ट्रवादीकडून मनसेला खिंडार; मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
5590

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का दिला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार नागेशशेठ चव्हाण आणि त्यांच्या मनसे पक्षातील सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : ‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’; एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा टोला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबई, औरंगाबाद आणि बार्शी येथील विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अल्पसंख्याक मंत्री तथा मुंबई प्रदेश अध्यक्ष नवाब मलिक, आमदार सतीश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, औरंगाबाद ग्रामीण जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील उपस्थित होते.

दरम्यान, मनसेचे उमेदवार नागेशशेठ चव्हाण यांच्यासह सोमनाथ चव्हाण, पवन श्रीमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील महेश साळुंखे, गणेश हजारे, अशोक शिंदे, संदेश कापसे, दिनेश साळुंखे, सोहेल शेख, युवराज वाघमारे, सिद्धू रोटे, असीम खान, विकास जाधव, रोहित वेलदरे, गोरोबा कदम यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधलं.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपच्या ‘या’ महिला आमदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला; चर्चेला सुरुवात

राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; कोकणातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही- नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here