जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

0
197

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर येत्या काही दिवसांत भाजपचा झेंडा फडकताना दिसेल, असं मोठं वक्तव्य भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही फुटणार का? याची चर्चा सुरू आहे.

“राष्ट्रवादीच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लागतो. हाच भाजपचा झेंडा येत्या काही काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असे मी विश्वासाने सांगतो, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले..

राष्ट्रवादीचे 90 टक्के कार्यकर्ते आपल्याला भाजपमध्ये जावे लागेल, असेही म्हणतील. मग मुंबईतील जे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यालय आहे, तिथे नेमका झेंडा कुणाचा लावावा? असा त्यांच्यात वाद होईल. त्यामध्ये बहुमताने लोक आता भाजपमध्येच जाऊया, असे म्हणतील”, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“आधी नाही म्हणाले, रागावले, चिडले, नंतर राज ठाकरेंनी जी कृती केली, त्याने सर्वांची मने जिंकली”

सांगलीत भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे…

शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, ठाकरे की शिंदे?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here