आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता अशातच सातारा जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नावरून आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : राज-उद्धव एकत्र येणार का?; बाळा नांदगावकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला फक्त खोक्याची भाषा कळत होती. त्यांचे कॉन्ट्रॅक्टर, बडे भांडवलदार यांच्याशीच संबंध होते, असं महेश शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेमणूक प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये जिल्ह्याला भरघोस निधी दिला आहे. कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी 50 कोटींचा निधी त्यांनी दिला आहे, अशी माहितीही महेश शिंदे यांनी यावेली दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“मोहित कंबोजनी 3 बँकांना चुना लावलाय; रोहित पवारांचं प्रत्युत्तर, 52 कोटींचाही केला उल्लेख”