Home महाराष्ट्र राज-उद्धव एकत्र येणार का?; बाळा नांदगावकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज-उद्धव एकत्र येणार का?; बाळा नांदगावकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का?, या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

दोन्ही भावंडं एकत्र आल्यास आनंदच होईल. कितीही मतभेद असले तरी संकटकाळात ठाकरे कुटुंबीय एकत्र येते हे सर्व महाराष्ट्र जाणतो. समोरून एकत्र येण्यासंदर्भात साद आल्यास राज ठाकरे नक्कीच विचार करतील, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. यावर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : …या कारणासाठी काँग्रेसचं, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन; 30-35 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शिवसेनेसोबत युती करण्यास राज ठाकरेच निर्णय घेतील. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. कारण यापूर्वी हे सर्व प्रयोग करून झालेले आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्या संपूर्ण राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून राज ठाकरे स्वतः माध्यमांशी संवाद साधतील, अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“मोहित कंबोजनी 3 बँकांना चुना लावलाय; रोहित पवारांचं प्रत्युत्तर, 52 कोटींचाही केला उल्लेख”

शिंदे गट भाजपमध्ये होणार विलीन?; वाशिम मध्ये लावलेल्या भावना गवळींच्या बॅनरवरुन चर्चा