Home महाराष्ट्र …या कारणासाठी काँग्रेसचं, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन; 30-35 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

…या कारणासाठी काँग्रेसचं, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन; 30-35 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागा मार्फत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच पर्यावरण प्रेमींचे आरे जंगल वाचावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर निषेध धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह काँग्रेसच्या 30 ते 35 आंदोलकांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी धनंजय पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.

ऑक्टोबर 2019 मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली. दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हज़ारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करीत होते त्यांना तुरुंगात डांबण्यात आले., असं धनंजय पाटील म्हणाले.

हे ही वाचा : राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. त्यावेळी एकनाथजी शिंदे हे महाविकास आघाडी सरकार मध्ये नगरविकास मंत्री होते. सरकारतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार श्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले. मुंबई व महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमी जनतेनी या निर्णयाचे स्वागत केले. परंतू आता नामदार श्री. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करताबरोबरच आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमी फार नाराज झाले आहेत. पर्यावरण व हवामान ढासळत असताना अश्या तुघलकी निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे हे निषेध धरणे आंदोलन करण्यात आले., असं धनंजय पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मोहित कंबोजनी 3 बँकांना चुना लावलाय; रोहित पवारांचं प्रत्युत्तर, 52 कोटींचाही केला उल्लेख”

शिंदे गट भाजपमध्ये होणार विलीन?; वाशिम मध्ये लावलेल्या भावना गवळींच्या बॅनरवरुन चर्चा

बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर..; राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत