Home महाराष्ट्र “राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली”

“राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली”

मुंबई : मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली !तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“…दुभत्या म्हशी च्या लाथा गोड”; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

…मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका- संजय राऊत

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका

“औरंगाबादमध्ये कडकडीत लाॅकडाऊन; पहा काय सुरू, काय बंद”