आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
भंडारा : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना यश मिळालं आहे.
या ठिकाणी नाना पटोले यांना एकटं पाडण्यासाठी भाजपने आपला राजकीय शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत युती केली होती. मात्र या निवडणूकीत काँग्रेस पक्ष समर्पित पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले असून भाजप राष्ट्रवादी युतीला फक्त 4 जागा मिळाल्या.
ही बातमी पण वाचा : “ना रोहित पवार, ना राम शिंदे; कर्जत बाजार समितीत कोणी मारली बाजी?”
दरम्यान, नाना पटोले यांच्या मतदार संघातील ही महत्त्वाची कृषि उत्पन्न बाजार समिती समजली जात होती. यामध्ये काँग्रेसने मोठं यश संपादन केले आहे. काल लाखनी येथील कृषि उत्पन्न बाजार समिती गमावल्यानंतर लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकली आहे. तर भाजपा राष्ट्रवादी युतीला मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ठाकरेंच्या शिलेदाराकडून, शिंदेंच्या शिलेदाराचा करेक्ट कार्यक्रम, मालेगावात ठाकरेंचं वर्चस्व”
राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं, आता संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी; काँग्रेसचा दारुण पराभव