Home महाराष्ट्र “राष्ट्रवादीत इनकमिंग सूरूच; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

“राष्ट्रवादीत इनकमिंग सूरूच; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या 40 व 10 अपक्ष आमदारांसोबत बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र अशावेळी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सूरूच आहे. आज भटक्या विमुक्त समाजाचे बडे नेते लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज पद्मश्री मा. लक्ष्मण माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंनी गोड बोलून, मनसेचा गळा कापण्याचा प्रयत्न केला”

मुंबई येथील प्रदेश कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण,  युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा. जयंत पाटील म्हणाले की, “श्री. माने यांनी आदरणीय खासदार शरद पवार साहेबांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आज प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे पक्षात स्वागत करत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“बाळासाहेब ठाकरे हा ब्रॅण्ड आहे, अन् उद्धवजी हा ब्रॅण्ड घेऊन राजकीय वाटचाल करत आहेत”

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला नाही; फडणवीसांना फोन केल्याच्या बातमीचं शिवसेनेकडून खंडण

“कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, खासदार संजय मंडलिक गटाचा, शिंदे गटात जाण्याचा निर्णय”