राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं अजित दादांच्या उपस्थितीत हाती बांधलं घड्याळ

0
807

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.

रिद्धी हर्षद बुधकर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुलतान मलदार यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

हे ही वाचा : मोठी बातमी! अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

यावेळी हर्षद बुधकर, नसरु मुल्ला आणि अमन कुरेशी यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

“औरंगाबादेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून मराठा क्रांती मोर्चा, एमआयएम आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी”

सत्तेसाठी भाजपाची मदत घेणाऱ्या शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here