“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”

0
427

नागपूर : राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत मोदींवर निशाणा साधला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं. लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केली.

दिल्लीत गेल्या 77 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनातील शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का? असा प्रश्नही नाना पटोलेंनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नाना पटोले पहिल्यांदाच नागपूरमध्य आले. यावेळी बोलताना त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी

शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं आणि अमित शाह हे खरं बोलले- चंद्रकांत पाटील

एकिकडे मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची आणि दुसरीकडे…; आशिष शेलारांची टीका

अमित भाईंच्या पायगुणानं महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल- चंद्रकांत पाटील

“मुंबईत भाजपला मोठा धक्का! राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here