प्रियंका चतुर्वेदींचा नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या,’नारायण राणेंना त्यांची…’

0
325

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर मंगळवारपासून संसदेत चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी सभागृहात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर टीका करताना खालच्या भाषेचा वापर केला.यावरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

नारायण राणेंचं संसदेतील भाषण म्हणजे केंद्र सरकारमध्ये कशाप्रकारचे मंत्री आहेत, हे दर्शवतं, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य; महणाले ‘युतीसाठी माझा फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी…’

खालच्या पातळीचं राजकारण करणं आणि दुसऱ्यांवर अभद्र टिप्पणी करणं, यावरून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे दिसतं, अशा शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांनी टीकास्र सोडलं आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

“अरे बस्स खाली बस्स… आमच्या पंतप्रधानांवर बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. तुझी औकात नाही. मी तुझी औकात काढेल”, अशा शब्दांमध्ये नारायण राणेंनी अरविंद सावंतांना इशारा दिला होता.

महत्त्वाच्या घडामोडी –

लोकसभेत राहुल गांधींनी, भाजप खासदारांना दिलेल्या प्लाईंग किसवर, आता प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या बैठकीत मोठं वक्तव्य; म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत…

उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंकडे नेतृत्व दिलं पाहिजे, तरच…; या नेत्याचं मोठं विधान

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? विजय वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया,म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here