Home देश कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

नवी दिल्ली : महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं होतं. यावर आता नारायण राणे यांनी  स्पष्टीकरण दिलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“दौरे फिरण्यासाठी केलेले नाहीत. त्यांनीही करु नयेत. आम्ही पूरस्थिती पाहण्यासाठी गेलो होतो. लोकांचं नुकसान झालं आहे. त्याची माहिती अधिकाऱ्यांना विचारणं, दाखवणं आमचं काम आहे. कारण शेवटी अंमलबजावणी करण्याचं काम अधिकारी करतात. त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी जातात तिथे अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे असा नियम आहे. म्हणून अधिकाऱ्याला तिथे बोलावलं होतं, पत्र पाठवून सांगितलं होतं. अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नाराजी जाहीर केली,” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नारायण राणे दौऱ्यासाठी आले असताना एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला होता. आधी फोनवरुन आणि नंतर समोरासमोर त्यांनी अधिकाऱ्याला याप्रकरणी जाब विचारला होता.

महत्वाच्या घडामोडी –

पंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी रूपये पाठवले तरी, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?”

राज कुंद्रा घरात घुसून KISS करू लागला आणि…; माॅडेल शर्लिन चोप्रानं केला धक्कादायक खुलासा