नारायण राणेंनी शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करावे; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची टीका

0
678

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : काही दिवसांपूर्वी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त टीका केली होती. त्यावरू शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नारायण राणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. ते बुलढाण्यात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.

राज्यातील उद्योगधंद्यांकडे राणे यांनी लक्ष द्यावे. नसते उद्योग करू नये. शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करावे, ते फक्त शिवसेनेवर भूंकण्यासाठी आहेत, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी राणे यांच्यावर हल्लाबोल केला.

हे ही वाचा : “महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार”

दरम्यान, नारायण राणे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी त्यांनी गायकवाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार गायकवाड कोण आहेत ? अधिवेशनात तर त्यांचा आवाज ऐकला नाही. विधानसभेत बोलत नाहीत. पण बाहेर भुंकायचे काम करतात. कुठे भुंकायचे काय करायचे हे त्यांना माहिती आहे. मला शिवसेनेला धारेवर धरायचे आहे, असं नारायण राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेट्सने पराभव; सेमी-फायनलचा मार्ग झाला आणखी खडतर

‘बापाच्या जीवावर राजकारणात असलेले सुप्रिया सुळेंसारखे फुटकळ नेते..’; अतुल भातखळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

 ‘आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here