आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर टिका केलीय. अशातच आता केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांनीही भाष्य केलंय.
“महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांबद्दल वक्तव्य करताना वापरलेल्या आपत्तिजनक भाषेचा मी निषेध करतो. काँग्रेसचे नेते या स्तरापर्यंत खाली जातील याचं मला आश्चर्य मला वाटत नाही,” असं नारायण राणे म्हणालेत.
हे ही वाचा : मी शांत बसलो आहे, पण…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
आता पोलिसांची जबाबदारी आहे की त्यांनी पटोलेंनी अटक करावी. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे,” असंही नारायण राणेंनी म्हटलंय.
दरम्यान, नाना पटोलेंनी हा व्हिडीओ खोडसाळपणे व्हायरल केला जात असल्याचा दावा करताना आपण मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबद्दल असं म्हणालो होतो, असं स्पष्टीकरण दिलंय.
पुलिस की ये जिम्मेदारी है कि अब पटोले को गिरफ्तार करे। यह राष्ट्रीय सुरक्षा से जुड़ा मुद्दा है।
— Narayan Rane (@MeNarayanRane) January 17, 2022
महत्वाच्या घडामोडी –
नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालायानेही नितेश राणे यांचा अर्ज फेटाळला
मी नरेंद्र मोदींबद्दल बोललो नाही; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण
“पवारांनी आधी फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवला, आता काशीचा घाट दाखवतील”