नाना पटोलेंची अवस्था रोज मरे, त्याला कोण रडे अशी झालीये- प्रवीण दरेकर

0
223

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला होता. यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोलेंनी एकदाच नाही, तर अनेक वेळा तलवार म्यान केली आहे. रोज मरे, त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झाली आहे. ते येतात जोरात. कदाचित त्यांच्या भावना खऱ्या असतील. त्यामुळे त्यांनी त्या ताकदीने मांडल्या. पण नंतर अजित पवारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार, असा टोला दरेकरांनी यावेळी लगावला.

दरम्यान, सरकार टिकणं ही सगळ्यांची गरज असल्यामुळेच नाना पटोले यांनी आपली तलवार म्यान केली असेल. पण बूँद से गई, वो हौद से नहीं आती है. भावना तर त्यांनी प्रकट केली आहे., अशी टीका दरेकरांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत- डाॅ.भागवत कराड

मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

“नितेश राणेंकडे असलेली प्रगल्भता दुर्देवानं शिवसेनेकडे नाही”

“संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here