माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा?

0
445

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पंकजा मुंडे यांनी आज या नाराज समर्थकांची वरळी येथील निवासस्थानी बैठक बोलावली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. माझा नेता नरेंद्र मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

तुमचं पद मला प्रीतम ताईंच्या मंत्रिपदापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आपलं घर आपण सोडायचं नाही. पंतप्रधान मोदींसाठी घोषणा द्या. त्यांना ऐकू जाईल एवढं मोठ्यांनी घोषणा द्या. माझ्या माणसांचे तुकडे पाडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते सफल होऊ देऊ नका, असं पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, पंकजा मुंडेंनी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नाना पटोलेंची अवस्था रोज मरे, त्याला कोण रडे अशी झालीये- प्रवीण दरेकर

मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत- डाॅ.भागवत कराड

मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

“नितेश राणेंकडे असलेली प्रगल्भता दुर्देवानं शिवसेनेकडे नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here