आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल 3 दिवसांपूर्वी जाहीर झाले. यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर शशिकांत शिंदेंवर टीका होत होती. यानंतर शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा : “भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांची राष्ट्रवादीत गृहवापसी होणार”
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे माझा पराभव झाला, हे त्यांचेच षडयंत्र आहे. आणि हे 100 टक्के खरं आहे, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केला. तसेच हिशेब चुकता करू’, असा इशाराही शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना दिला. यावरून आता शिवेंद्रराजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हिशेब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका. मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही. यापुढे तुमची दहशत, गुंडगिरी जावळी तालुका चालू देणार नाही. तुमच्या पराभवाला तुमचा जावळीतील अनावश्यक हस्तक्षेपच जबाबदार आहे, असा पलटवार शिवेंद्रराजेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेनं भाजपसोबत पुन्हा सत्ता स्थापन करावी- रामदास आठवले
ज्यांच्या बुद्दीला जे योग्य वाटलं ते ते बोलले; अजित पवारांचा राणेंना टोला
“उद्धव ठाकरेच बेस्ट सीएम; मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मतदारांची सर्वाधिक पसंती”