Home महाराष्ट्र “भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांची राष्ट्रवादीत गृहवापसी होणार”

“भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांची राष्ट्रवादीत गृहवापसी होणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : शिवसेनेनं भाजपसोबत पुन्हा सत्ता स्थापन करावी- रामदास आठवले

उलट भाजपमध्ये गेलेले आमदार स्वगृही परतणार असल्याचा दावा नवाब मलिकांनी यावेळी केला. मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार तसेच भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची पुन्हा घरवापसी होणार, असं नवाब मलिक म्हणाले.

शरद पवार, प्रफुल्ल पटेल हे काल दिल्लीला पार्लमेंटच्या डिफेन्स कमिटीच्या बैठकीसाठी गेले होते. दरम्यान नारायण राणे यांचं वक्तव्य आलं की, मार्च महिन्यात आम्ही सरकार बनवणार. नारायण राणे यांच्या वक्तव्यनंतर एक पॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. ज्यात अमित शहा शानमध्ये बसले आहेत आणि शरद पवारांचा ज्या प्रकारे फोटो दाखवण्यात आला आहे तो अपमानित करण्यासाठी मॉर्फ फोटो व्हायरल केला होता. मात्र भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा जास्त वेळ चालणार नाही, असा इशारा नवाब मलिकांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

ज्यांच्या बुद्दीला जे योग्य वाटलं ते ते बोलले; अजित पवारांचा राणेंना टोला

“उद्धव ठाकरेच बेस्ट सीएम; मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मतदारांची सर्वाधिक पसंती”

अमल महाडिकांची माघार; कोल्हापुरातून सजेत पाटील बिनविरोध