आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : हिंमत असेल तर समोरासमोर या, आपण दोघेही ईडीच्या चौकशीला जाऊ. पहिली चौकशी माझी होऊ द्या, असं खुलं आव्हान खासदार उदयनराजे भोसलेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांंना अप्रत्यक्ष दिलं आहे.
खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत, असं म्हणत अप्रत्यक्षपणे उदयनराजेंवर आरोप केले होते. तसेच सातारा एमआयडीसीचा विकास खंडणी, टक्केवारी नेत्यांमुळे रखडला आहे. टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाका, असं सांगत अजित पवारांनी त्यांच्याकडे आलेला व्हिडिओ देत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना चौकशी करण्याची सूचना केली होती. यावरून आता उदयनराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा टोला
‘मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार राहा’, असं आवाहन उदयनराजेंनी अजित पवारांना दिलं.
दरम्यान, ज्यावेळी साताराच्या एमआयडीसीला परवानगी दिली त्यावेळी अन्य जिल्ह्यात एमआयडीसीची परवानगी दिली. तेथील परिस्थिती आज किती चांगली आहे. मग साताऱ्याची दयनीय अवस्था झाली त्यासाठी जबाबदार कोण आहे?. तुमची पण जबाबदारी होती ना? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, उपमुख्यमंत्री आहात. त्यावेळी तुम्ही पालकमंत्री, मंत्री होतात. त्यावेळचे आमदार, खासदार यांची पण जबाबदारी होती, त्यांनी लक्ष का दिले नाही, असा सवाल उदयनराजेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; भारती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
सदाभाऊ, आधी हाॅटेलची उधारी द्या, मग पुढे जावा; सांगोलात हाॅटेल चालकानं सदाभाऊंचा ताफा अडवला