आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची साताऱ्यात भेट घेतली आहे. या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही.
सातारा शहरातील वाहतुकीच्या संदर्भात खासदार उदयनराजेंनी भेट घेतली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली आहे.
हे ही वाचा : …तर आज राज ठाकरेही मुसलमान झाले असते- रामदास आठवले
दरम्यान, सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याबाबत वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. औंध पोलीस ठाण्याच्या तुरुंगातून 5 दरोडेखोर पोलिसांना मारहाण करून पळून गेले होते. त्यामुळे पोलीस दलात साशंकता निर्माण झाली होती. मात्र यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसे आणि भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत”
“मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन…”; अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य