Home महाराष्ट्र खासदार उदयनराजे भोसले मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार; हर्षवर्धन पाटलांनी दिली...

खासदार उदयनराजे भोसले मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार; हर्षवर्धन पाटलांनी दिली माहिती

431

सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर खासदार उदयनराजे भोसले हे देखील मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार असल्याची माहिती भाजप नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील 2 दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठा समाजातील प्रमुख लोकांशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनाबाबत पुढाकार घेण्यास ते तयार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांना उपचाराची गरज; संजय राऊतांचा टोला

मोदींना पाहून लोकांनी मतदान केलं, बाळासाहेबांना पाहून शिवसेनेला सत्ता दिली- राज ठाकरे

CBSE Board Exam! बारावीच्या परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय

“भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल”