मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून त्याला आता हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद याचं नाव दिलं आहे. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदी-दिवंगत जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय… त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?, असा सवाल सामनातून संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं नामकरण केलं गेलं. केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत, अशी टीकाही सामनातून केंद्र सरकारवर केली आहे.
दरम्यान, मोदी सरकारचे म्हणणे आहे की, ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देणे ही लोकभावना आहे. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल, असा मुद्दाही सामनात यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले; केशव उपाध्येंची ठाकरे सरकारवर टीका
कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रातील भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण ऐकत नाहीत- नवाब मलिक
“पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द; भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना अनिर्णीत”