आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता परभणी येथील सेलू शहरात अनेकांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला.
सेलू शहरातील शासकीय विश्रामगृहमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मनसे नेते दिलीप धोत्रे आणि मनसे प्रदेश सरचिटणीस संतोष नगरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
हे ही वाचा : नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…; अमृता फडणवीसांचं नवं ट्विट
शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे, जिल्हाध्यक्ष राज शेख, जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष नाना तुपे, जिल्हा सचिव गणेश भिसे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव रोडगे, सेलू तालुका अध्यक्ष निजलिंग आप्पा तरोडगे, जिंतूर तालुका अध्यक्ष ओंकार देशमाने, सेलू शहराध्यक्ष गणेश निवळकर,जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ भुमरे, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ काठोळे, सेलू शेतकरी सेना तालुका अध्यक्ष वैजनाथ मुसळे, सेलू तालुका संघटक सय्यद जावेद, जिंतूर तालुका संघटक रामभाऊ मोगल,जिंतूर कामगार सेना तालुका अध्यक्ष उध्दव पुरी,जिंतूर शहर संघटक अभिजित साळवे, जिंतूर शहर शेतकरी सेना संघटक विश्वनाथ खापे, जिंतूर उप शहर संघटक योगेश पवार, मनविसे जिंतूर तालुका अध्यक्ष नितीन कोकाटे, जिंतूर तालुका उपाध्यक्ष गणेश ठाकूर, सेलू शहर विभागाध्यक्ष शेख जमिल, सेलू उपशहर अध्यक्ष कृष्णा चव्हाण, सेलू कामगार सेना तालुका अध्यक्ष अशोक मुदमळे, सेलू कामगार सेना शहराध्यक्ष गजानन मानवतकर, सेलू शहर कामगार सेना संघटक शेख यकीन, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…
निवडणूक लढवायला बायको पाहिजे, तरुणाने लावले बॅनर; भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक
राष्ट्रवादीकडून भाजपला मोठं खिंडार, इंदापूरमधील सरपंचासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ