आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. तसेच अजूनही हे आंदोलन सूरूच आहे. आता यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
हे ही वाचा : “महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच चमत्कार 2024 ला दिल्लीत होणार”
एसटीला फायद्यात आणायचं असेल तर खाजगीकरण करून चालणार नाही. त्यासाठी एखादी कंपनी नेमा, असा उपाय राज ठाकरे यांनी सरकारला सूचवला आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना समजून घेणे गरजेचं आहे. एसटीचे खासगीकरण करण्यापेक्षा एखादी चांगली कंपनी नेमा. एसटी चालवण्यासाठी एखादी चांगली कंपनी का आणली जात नाही? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
…हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
‘मला भावलेले पवार साहेब’ असं कॅप्शन देत अमोल कोल्हेंनी शेअर केला व्हिडीओ