Home तंत्रज्ञान मारुती सुझुकीने कंपनीने परत मागवल्या तब्बल 63,493 गाड्या

मारुती सुझुकीने कंपनीने परत मागवल्या तब्बल 63,493 गाड्या

285

नवी दिल्ली : देशातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकीने शुक्रवारी 63,493 गाड्या परत मागवल्या म्हणजे रिकॉल केल्या आहेत. कंपनीने 1 जानेवारी 2019 ते 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत मॅन्युफॅक्चर केलेल्या कार परत मागवल्या आहेत.

कंपनीने परत मागवलेल्या गाड्यांमध्ये सियाझ, अर्टिगा आणि XL6 च्या पेट्रोल स्मार्ट हायब्रिड व्हेरिअंट्सचा समावेश आहे. या कारमधील मोटर व्हेईकल जनरेशन युनिट मधील कमतरतेची तपासणी करण्यासाठी या कार परत मागवण्यात आल्या आहेत.

परत मागवण्यात आलेल्या कारच्या मालकाशी मारुतीच्या डिलर्सकडून संपर्क साधला जाणार आहे. जर गाडीमध्ये दुरूस्तीची आवश्यकता असेल तर ग्राहकाला पर्यायी वाहन उपलब्ध करुन देण्याचाही कंपनीचा प्रयत्न असेल. दुरूस्तीसाठी कंपनीकडून कोणतेही अतिरिक्त शूल्क आकारले जाणार नाही.

ज्या गाड्यांमध्ये दुरूस्तीची आवश्यकता असेल त्या मोफत दुरूस्त केल्या जातील”, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, यापूर्वी कंपनीने ऑगस्ट महिन्यात ‘फ्युल हॉज’मध्ये दुरुस्तीसाठी 40,618 WagonR गाड्या परत मागवल्या होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून विजय

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण स्वागतार्ह वाटतो- राज ठाकरे

“महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे”

न्याय झालाय पण ही पद्धत अन्यायकारक- नवाब मलिक