आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चेन्नई : आयपीएलचा 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आज आयपीएलचा 6 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध लखनाै सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने लखनाैचा 12 धावांनी पराभव केला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावत 217 धावा केल्या. चेन्नईकडून ऋुतुराज गायकवाड याने सर्वाधिक 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. या खेळीत 3 चाैकार, 7 षटकारांचा समावेश होता. तर डेव्हाॅन काॅन्वे 29 चेंडूत 47 धावा, शिवम दुबे 16 चेंडूत 27 धावा, मोईन अली 13 चेंडूत 19, अंबाती रायडू 14 चेंडूत नाबाद 27 धावा, तर कर्णधार एम.एस.धोनीने 3 चेंडूत 12 धावा कुटल्या. तर लखनाैकडून मार्क वूड व रवी बिश्नोईने 3 विकेट्स, आवेश खाननं 1 विकेट घेतली.
ही बातमी पण वाचा : “मविआला मोठा धक्का, कालच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”
दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना लखनाैचा संघ 20 षटकात 7 विकेट गमावात 205 धावसंख्येपर्यंत पोहचू शकला. लखनाैकडून कायले मियर्सने 22 चेंडूत 53 धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीत 8 चाैकार, तर 2 षटकारांचा समावेश होता. तर निकोलस पूरनने 18 चेंडूत 32 धावा केल्या. तर चेन्नईकडून मोईन अलीने 4, तुषार देशपांडेने 2, तर मिचेल सँटनरने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी
“मोठी बातमी! लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप?; अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?”
भाजपचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
सुषमा अंधारे आक्रमक; संजय शिरसाट यांच्याविरोधात ठोकला ‘इतके’ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा