Home महाराष्ट्र वाट लागल्यावर मराठी माणूस आठवतो; ‘सामना’ अग्रलेखावर नितेश राणेंची टीका

वाट लागल्यावर मराठी माणूस आठवतो; ‘सामना’ अग्रलेखावर नितेश राणेंची टीका

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. त्यानंतर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला.

शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाकडून महाराष्ट्र सरकारवर टीका सुरु आहे. बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केले म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असे कुणाचे निरीक्षण असेल व त्या आधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज देशाची घटना ही अश्रू ढाळत असेल, असं आग्रलेखात म्हटलं होतं. यावरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी टि्वट करुन शिवसेनेवर टीका केली आहे.

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय : 1.) मराठी अस्मिता 2.) महाराष्ट्र धर्म 3.) मराठी माणूस असे असतील. Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही. पाहिजे असतात. .वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस ! असं नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, काल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर नितेश राणे यांनी टि्वट केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोना व्हायरसची ‘ती’ काॅलरट्यून आता बंद करा; मनसेची मागणी

राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये- रुपाली चाकणकर

“जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय”

राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलतात; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला