मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याला विधान परिषदेवर आमदार करा, अशी मागणी केली आली आहे. तसं पत्र राज्यपालांना दिलं असल्याचं सदाभाऊंनी सांगितलं.
राज्यपाल कोश्यारींनाना लिहिलेल्या पत्राद्वारे गोलंदाज झहीर खान यांच्यासह 12 जणांच्या नावाचा राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी विचार करावा, अशी विनंती सदाभाऊंनी केली आहे.
दरम्यान, या यादीत क्रिकेटर झहीर खान, मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावं सदाभाऊ खोतांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सुचवण्यात आली आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली?- अजित पवार
“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…;” चंद्रकांत पाटलांचा टोला
आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू- संजय राऊत