Home महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास- नितेश राणे

राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास- नितेश राणे

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

हॉलतिकीट कशाला काढली. विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलं आहे. त्यांचं नुकसान झालं तर ते सरकार भरून देणार का?, असा सवाल करत राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी नितेश राणेंनी यावेळी केली आहे.

“विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. जेव्हा भ्रष्टाचार करायचा असतो. टेंडर पास करायचे असते, तेव्हा सरकारमधील लोकांचा ताळमेळ चांगला असतो, राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे, असं नितेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

‘बडे मिया-छोटे मिया’ छोटे मिया सुभानल्लाह गाण्यावर धवन-सूर्यकुमारची जबरा ऍक्टिंग; पहा व्हिडिओ

“सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा”

सौरव गांगुलीने केली ‘या’ युवा भारतीय खेळाडूची सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी तुलना

हे एक नंबर लबाड सरकार; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका