“आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्तेच होणार”

0
353

पंढरपूर : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आषाढ शुद्ध देवशयनी एकादशी संपन्न होणार आहे. विठ्ठल-रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्याचा मान हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय मंदिर समितीच्या सभेत घेण्यात आला.

01 जुलै 2020 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे 02.20 वाजता श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाचे वारकरी यांचे हस्ते होणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समिती पंढरपूरच्या वतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 11 जून 2020 रोजी शासकीय महापूजेस सपत्नीक येण्याचे निमंत्रणपत्र मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनीथ महाराज औसेकर यांचे स्वाक्षरीने ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला

माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा… ; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

‘या’ कारणामुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी करणार स्वतंत्र चर्चा

तरुणांनो घराबाहेर पडून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here