Home महत्वाच्या बातम्या “लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही, अफवांवर विश्वास नका ठेऊ”- उद्धव ठाकरेंचं जनतेला...

“लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही, अफवांवर विश्वास नका ठेऊ”- उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन 30 जूनपर्यंत असणार आहे. दरम्यान लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे.

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, त्यामुळं कुठेही गर्दी करू नका. तसेच शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

दरम्यान, काही समाजमाध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत, असे गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो..; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांवर निशाणा