Home महाराष्ट्र राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोललं पाहिजे-...

राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

मुंबई : लॉकडानच्या काळात परीक्षा घ्यायची की नाही हा मोठा गोंधळ राज्यात निर्माण झाला असून राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये यावरुन वाद सुरु आहे. यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर असून दापोलीत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद आहे. त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोललं पाहिजे. परीक्षा घ्यायच्या की नाही यासंदर्भात राज्य सरकारनेच स्वत: कुलगुरुंची कमिटी तयार केली. त्या कमिटीने सांगितलं की, परीक्षा घेतल्या पाहिजे. कशा घ्यायच्या हेदेखील सांगितलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या सर्व व्यवस्थेचे मुख्य कुलपती म्हणजेच राज्यपाल आहेत. त्यांच्याशिवाय निर्णय घेतला जाऊ शकत नाही. तरीही मंत्र्यांनी परीक्षा घेणार नाही जाहीर केलं. सरकारला जर परीक्षा घेतली जाऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी राज्यपालांना भेटून याची कारणं सांगितली पाहिजेत, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांवर निशाणा

राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

“आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्तेच होणार”

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला