Home बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले; पंकजा मुंडेंचा घणाघात

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले; पंकजा मुंडेंचा घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : मराठवाड्यात झालेल्या तुफान पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधालाय.

नागरिकांना केलेल्या मदतीच्या आश्वासनाचं काय झालं हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. त्या टीव्ही 9 मराठीशी संवाद बोलत होत्या.

“मदतीच्या आश्वासनाचं काय हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले. राज्य सरकार हे आई वडील आहे, तर केंद्र सरकार ग्रँड प्यारेन्ट्स म्हणजे आजी-आजोबा असतात. त्यामुळे केंद्राची मदत येईलच, तो विषय वेगळा आहे. पण राज्य सरकारने आई-वडिलांची भूमिका पार पाडावी”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; नाशिकमध्ये 122 शाखाध्यक्षांची नियुक्ती

“चित्रा वाघ यांना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणं, वेळीच दाखवून घ्या”

राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा बनलाय; नवाब मलिकांचा हल्लाबोल

‘काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय घेतंय कोण?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा घरचा अहेर