Home नाशिक मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; नाशिकमध्ये 122 शाखाध्यक्षांची नियुक्ती

मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; नाशिकमध्ये 122 शाखाध्यक्षांची नियुक्ती

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये जिल्हा व शाखाध्यक्षांची खांदेपालट करीत 122 शाखाध्यक्षांची नियुक्ती केली.

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र पक्षांतर्गत वादामुळे मागील निवडणुकीत मनसेला सत्ता गमवावी लागली होती. मात्र, आता पुन्हा महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आली असून त्यांचे नेतृत्व पुढे आणण्यावर मनसे कामाला लागली आहे. यासाठी संघटना मजबूत करून पर्यायांची चाचपणी होत असल्याची माहिती समोर आली.

मनसेकडून करण्यात आलेल्या खांदेपालटातून गटबाजी रोखण्यासाठी राज ठाकरे स्वतः लक्ष केंद्रित करून आहेत. यामुळे राज ठाकरे यांचे नाशिक दौरेही वाढले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“चित्रा वाघ यांना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणं, वेळीच दाखवून घ्या”

राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा बनलाय; नवाब मलिकांचा हल्लाबोल

‘काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय घेतंय कोण?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा घरचा अहेर

भाजपच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा लहान फोटो; मनसेने केली भाजपवर नाराजी व्यक्त