पीएमसी घोटाळ्याचा मास्टरमाइंड किरीट सोमय्या, तर त्यांचा मुलगा या मास्टरमांईडचा डायरेक्टर; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

0
280

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे., असा गाैफ्यस्फोट संजय राऊतांनी यावेळी केला.

हे ही वाचा : हिंदूहृदयसम्राट नको मराठी हृदयसम्राट म्हणा; घाटकोपरमधील घोषणाबाजीवरून राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल.. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली.

दरम्यान, पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला. ईडी वाले सुनो. सीबीआयवाले सुनो. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची.. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

ईडीची भिती दाखवता काय?; पण लक्षात ठेवा, आम्ही…; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

राणेंना शिवसेनेचा पुन्हा दणका; कुडाळ नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विजयानंतर शिवसैनिकांनी केला कोंबडा डान्स

“वर्ध्यात राष्ट्रवादीचा मनसेला दणका, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here