मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी चालू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यातच आता सीबीआयने आपल्या प्राथमिक अहवालात अनिल देशमुखांना क्लिनचीट दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली.
सीबीआयच्या प्राथमिक अहवालात आमचे नेते अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिल्याची माहिती कळते आहे. यामुळे परमवीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे होते, हे सिद्ध झालंय. दूध का दूध पानी का पानी झालं, आता खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग याच्या मुसक्या आवळणंं गरजेचं आहे, असा हल्लाबोल हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई महापालिका स्वबळावर जिंकली पाहिजे, कुणाची लाचारी आपल्याला नको- संजय राऊत
“ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील, त्यामुळेच त्यांनी परब यांना नोटीस पाठवली असेल”
भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की, संसद आत्महत्या करते- पृथ्वीराज चव्हाण
“मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस”