Home महाराष्ट्र मुंबई महापालिका स्वबळावर जिंकली पाहिजे, कुणाची लाचारी आपल्याला नको- संजय राऊत

मुंबई महापालिका स्वबळावर जिंकली पाहिजे, कुणाची लाचारी आपल्याला नको- संजय राऊत

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचं वारं आता सर्वत्र फिरू लागलं असून, सर्वच पक्ष राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यास तयार असल्याचं दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

मी शिवसैनिक आहे. सगळीकडे प्रचार करत असतो. मुंबई महापालिका स्वबळावर जिंकली पाहिजे, कुणाची लाचारी आपल्याला नको., असं संजय राऊत म्हणाले. ते विक्रोळी येथील सूर्या नगरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

बाळासाहेबांच्या मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकवेन, ही प्रतिज्ञा घेवून प्रत्येकानं काम करायला पाहिजे. तसेच मुंबई महापालिकेवर सध्या शिवसेनेचीच सत्ता आहे. महापालिकेवर अनेक वर्षे भगवा फडकत असून विजयाची तीच परंपरा कायम राखणार असल्याचं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला डच्चू देऊन स्वबळावर लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील, त्यामुळेच त्यांनी परब यांना नोटीस पाठवली असेल”

भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की, संसद आत्महत्या करते- पृथ्वीराज चव्हाण

“मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस”

“शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट, चर्चांना उधाण”