मोठी बातमी! रोहिणी खडसेंना जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात, एकनाथ खडसेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

0
1328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. यानंतर जळगाव पोलिसांनी, रोहिणी खडसे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावरून आता एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

शासनाच्या माध्यमातून पोलिसांची ही दडपशाही सुरू आहे. वास्तविक कुणीही काळे झेंडे दाखवले नाहीत किंवा ते रस्त्यावरही उभे नव्हते. ज्यांना ताब्यात घेतलं, ती सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसले होते. असं असताना पोलिसांनी कार्यालयात धुडगूस घालून रोहिणी खडसेंना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. महिलांना जबरदस्तीने उचलून नेलं. हे काय सुरू आहे? ही काय हुकूमशाही आहे का?, अशी संतप्त प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी यावेळी दिली.

ही बातमी पण वाचा : “केसीआर यांचा झाला मोठा राजकीय गेम, महाराष्ट्रात दिमाखदार एंट्री, मात्र तेलंगनामध्ये मोठा उलटफेर”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. यानंतर जळगाव पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि महानगर प्रमुख अशोक लाड वंजारी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. रोहिणी खडसे यांना ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले, “शासनाच्या माध्यमातून पोलिसांची ही दडपशाही सुरू आहे. वास्तविक कुणीही काळे झेंडे दाखवले नाहीत किंवा ते रस्त्यावरही उभे नव्हते. ज्यांना ताब्यात घेतलं ती सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसले होते. असं असताना पोलिसांनी कार्यालयात धुडगूस घालून रोहिणी खडसेंना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. महिलांना जबरदस्तीने उचलून नेलं. हे काय सुरू आहे? ही काय हुकूमशाही आहे का?”

दरम्यान, कापूस दराच्या प्रश्नावरून आम्ही शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दिला होता. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून जळगाव पोलिसांनी रोहिणी खडसेंना ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

संभाजी भिडे यांची पुन्हा जीभ घसरली; केली थेट काँग्रेसवर टीका, म्हणाले ‘हा’ तर…

आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र…; महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा

विरोधी पक्षनेतेपद का नकोय?; अखेर अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले, अरे बाबा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here