अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
349

मुंबई : आमच्यामध्ये विदर्भाचं रक्त आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यात फडणवीस बोलत होते.

अंगात केवळ विदर्भाचं रक्त असून चालणार नाही तर विदर्भाशी प्रामाणिक राहा, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

आमच्यामध्ये विदर्भाचं रक्त आहे, किमान हे म्हणण्याची तरी वेळ मुख्यमंत्र्यांवर आली याचं आम्हाला समाधान आहे. पण विदर्भाचं नुसतं रक्त असून चालणार नाही. कारण अनेक नेत्यांनी विदर्भाशी बेईमानी केली तशी बेईमानी तुम्ही करु नका, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण – आशिष शेलार

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here