दुबई : आजच्या आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्सचा 7 विकेट्सनी पराभव केला.
या सामन्यात चेन्नईने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 125 धावा केल्या. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 30 चेंडूत 35 धावा केल्या. तर एम.एस धोनीने 28 चेंडूत 28 धावा, सॅम करनने 25 चेंडूत 22 धावा केल्या. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल व राहूल टेवाटियाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना राजस्थानने हे लक्ष्य केवळ 17.3 षटकात 3 गडी गमावत पूर्ण केले. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक नाबाद 48 चेंडूत 70 धावा केल्या. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने 34 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने 2, तर जोश हेझलवूडने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
“मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
रविंद्र जडेजाची एकाकी झुंज; चेन्नईचे राजस्थानसमोर विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य