मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेट देण्यास निघाले होते. मात्र युपी पोलिसांनी त्यांना अडवत धक्काबुक्की करत अटक केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षांना चिरडण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही, असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.
1977-80 च्या काळामध्ये इंदिरा गांधींना चिरडण्यासाठी सत्तेचा अतिरेकी वापर झाला. आणि निकाल काय लागला तर 1980 साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. आज जे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सोबत घडले ते काही वेगळे नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
1977-80 च्या काळामध्ये इंदिरा गांधींना चिरडण्यासाठी सत्तेचा अतिरेकी वापर झाला. आणि निकाल काय लागला तर 1980 साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. आज जे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सोबत घडले ते काही वेगळे नाही.
विरोधी पक्षांना चिरडण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 1, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं छत्रपती संभाजीराजेंना पत्र”
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण”
“मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”
“हाथरसमधली घटना पाशवी; महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?”