Home महाराष्ट्र जयंत पाटील म्हणाले शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; आता दीपक केसरकर म्हणतात…

जयंत पाटील म्हणाले शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; आता दीपक केसरकर म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यानंतर उध्दव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.

हे ही वाचा : ठाण्यात राडा! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण

सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णय दिला तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल आणि राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं. जयंत पाटील यांच्या या विधानावर मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी पलटवार केला आहे.

मी आजपर्यंत समजत होतो की जे लोक उशीरापर्यंत झोपतात, तेच तेच स्वप्न बघतात. त्यांनाही स्वप्न पडायची की महाराष्ट्रात सत्ताबदल होईल. जयंत पाटील तर लवकर उठतात. अजित पवार लवकर उठतात. तेही स्वप्न बघायला लागले तर राजकारणाचे कसे होईल याची मला चिंता वाटते, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार?; अमित शहांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…

“IPL च्या आधी मोठी बातमी! मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला, ‘या’ आक्रमक खेळाडूकडे सोपविली कर्णधारपदाची धुरा”

…म्हणून तेंव्हा शिवसेनेसोबत युती केली; अमित शहांचं, उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान