Home महाराष्ट्र …म्हणून तेंव्हा शिवसेनेसोबत युती केली; अमित शहांचं, उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान

…म्हणून तेंव्हा शिवसेनेसोबत युती केली; अमित शहांचं, उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : नेटवर्क 18 च्या वतीने आज रायझिंग इंडिया हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली.

या मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना अमित शहांनी भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

हे ही वाचा : “आता मंत्र्यांवर कोरोनाचं सावट; छगन भुजबळांनंतर आता शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढलो. फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो. जर भाजप एकटी लढली असती तर पूर्ण बहूमत मिळालं असतं. पण शिवसेनेसोबत जुनी मैत्री होती, म्हणून त्यांच्यासोबत युती केली, असा गाैफ्यस्फोट अमित शहांनी यावेळी केला.

दरम्यान, महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढलो. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, पण जनतेत गेले तेव्हा त्यांच्यातील वैचारिक मतभेद दिसायला लागले. आमदार पळाले ते आमच्यामुळे नाही तर जनतेच्या दबावामुळे पळाले. खरी शिवसेना आमच्यासोबत एकत्र आली आहे. आगामी निवडणूक एकत्र लढवू आणि जिंकूही., असा दावा अमित शहांनी यावेेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवारांचा मोठा निर्णय; कर्नाटक निवडणुकीत ‘या’ पक्षाला देणार राष्ट्रवादी पाठिंबा

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक

एकनाथ शिंदे फक्त मुखवटा, राज्य तर देवेंद्र फडणवीसच चालवतात; राष्ट्रवादीची टीका