Home महाराष्ट्र शरद पवारांचा मोठा निर्णय; कर्नाटक निवडणुकीत ‘या’ पक्षाला देणार राष्ट्रवादी पाठिंबा

शरद पवारांचा मोठा निर्णय; कर्नाटक निवडणुकीत ‘या’ पक्षाला देणार राष्ट्रवादी पाठिंबा

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही केली जाऊ शकते. याच पार्श्भूमीवर काँग्रेसनेआपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. तर बेळगाव आणि परिसरात महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीच्या मैदानात उतरली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समितीच्या नेत्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र दिला आहे.

हे ही वाचा : खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्र एकीकरण समितीने विधानसभेची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवावी, अशी सूचना शरद पवार यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

निवडणूक आयोगाकडून कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही केली जाऊ शकते. त्यामुळे विधान सभा निवडणुकीबाबत शरद पवार यांनी समितीच्या नेत्यांसोबत चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघात काय स्थिती आहे, याची माहिती त्यांनी समितीच्या नेत्यांकडून जाणून घेतली. त्यामुळे पवार निवडणुकीत पूर्ण लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

एकनाथ शिंदे फक्त मुखवटा, राज्य तर देवेंद्र फडणवीसच चालवतात; राष्ट्रवादीची टीका

संजय शिरसाट म्हणाले, एकही अश्लील शब्द वापरल्यास राजीनामा देईन, आता सुषमा अंधारेंचा पलटवार, म्हणाल्या…

मोठी बातमी! छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती